Download App

आयुष्यात कधीही विचार केला नव्हता… अजय-अतुलने शेअर केले ‘ते’ फोटो

Atul Shere photo with Shaheer Sabale : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ ​​महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट करत असून त्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे. या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहे. त्यातील अनेक गाणी चाहत्यांच्या आवडीची आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स व्हायरल झाले आहेत. खासकरुन बहरला मधूमास हा…या गाण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

Jiah Khan: अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर 10 वर्षात नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

या चित्रपटाच्या निमित्ताने अजय-अतुल या जोडीतील अतुल गोगावले यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजय-अतुल स्वतः शाहीर साबळे यांच्या सोबत दिसत आहेत. ते दोघे यामध्ये गायनाचा रियाज करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अतुलने लिहिले की, ‘आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की, इतक्या जवळून ह्यांची भेट घडेल. मोठा माणूस ! त्याहून मोठं त्यांच कार्य !!!’ असं म्हणत त्याने अभिमान व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा (Maharashtra Shahir) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.

Tags

follow us