Avdhoot Gupte New Album: अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte ) हा गुणी कलाकार मराठी मनोरंजन सृष्टीला लाभला आहे. तो उत्तम संगीतकार आहेच. शिवाय तो उत्तम गातो हे आपण सगळेच जाणतो. कारण, अवधूत गुप्ते संगीतकार, गायक यांसोबत तो निर्माता, दिग्दर्शकही आहे. अनेक नव्या गोष्टी तो सातत्याने करत असतो. त्याने सुरूवातील आणलेला जय जय महाराष्ट्र माझा.. हे गाणं असू दे किंवा मनमोराचा कसा पिसारा फुलला.. हे गाणं असू दे. त्याने नेहमीच हटके प्रयोग केले. लोकांना ते भावले. आता अवधूत गुप्तेंच्या ‘विश्वमित्र’ या नवीन अल्बमची घोषणा करण्यात आली आहे.
अवधूत गुप्ते हे त्यांच्या चाहत्यांसाठी, संगीतप्रेमींसाठी नेहमीच काहीनाकाही नवीन घेऊन येत असतो. त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.
या अल्बममध्ये ४ गाणी असणार आहेत. प्रत्येक गाणं एका तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगेल. ‘लवचा खंजीर जर एकदा छातीत घुसला तर कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी’ असं म्हणत लवकरच यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटली येणार आहेत.
Baipan Bhari Deva: जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ मासिकात झळकले दिग्दर्शक साई-पियूष अन् केदार शिंदे
या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि संगीतप्रेमींसाठी आम्ही एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ अल्बम घेऊन आलो आहे. या अल्बममध्ये चार गाणी आहेत. ही चारही गाणी अधुऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. जसं प्रेम ‘लावण्यवती’ ला मिळालं तसंच ‘विश्वामित्र’ ला ही मिळेल याची मला खात्री आहे.“