“बागुलबुवा” मराठीतील पहिला एआय चित्रपट; अभिनेता अभिजीत खांडकेकर सोबत 55 कलाकारांची दमदार फौज

Bagulbuva Marathi AI Film: एआयच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'बागुलबुवा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Bagulbuva Marathi AI Film

Bagulbuva Marathi AI Film

Bagulbuva Marathi AI Film: आताच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) प्रभाव सर्वच क्षेत्रांवर वाढत आहे. एआयद्वारे आतापर्यंत काही चित्रपटांची निर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत झालेला नाही. ही उणीवही आता भरून निघाली असून, एआयच्या माध्यमातून पहिल्यांदाच ‘बागुलबुवा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे खरे कलाकार घेऊन एआयच्या माध्यमातून हा चित्रपट तयार करण्यात आला असून असा नाविन्यपूर्ण प्रयोग करून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

प्रभासच्या वाढदिवशी ‘फौजी’चे जबरदस्त पोस्टर रिलीज, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली !

एस एस फिल्म्स प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली असून शरद पाटील, अंजली पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा यांनी या चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केले असून नितिन चव्हाण यांनी पटकथा लेखन, विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स, आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्ड केला आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने या चित्रपटाच्या एआयचे काम पाहिले आहे.आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना गीत साई पियूष यांचे संगीत लाभले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात झळकणार असून अन्य 55 दमदार कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

“बागुलबुवा” या चित्रपटाचे टायटल टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून एखाद्या हॉलिवूडपटासारखा भासणारा हा टायटल टीजर आहे. चित्रपटातील कथानक पुणे आणि परिसरात घडत असल्याचं दिसतं. अचानक एक संकट येत आणि त्याच्याकडे पाहिल्यावर डोळे बिघडतात अशी स्थिती होते. संकट म्हणून आलेला हा “बागुलबुवा” म्हणजे नेमकं काय आहे याचं उत्तर चित्रपटातूनच मिळणार आहे. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा स्वरुपाचं, इतक्या भव्यतेचं चित्रण कोणत्याही टीजर, ट्रेलरमध्ये पहायला मिळालेलं नाही त्यामुळे या ‘बागुलबुवा’विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या पुढाकारातून वसंतनगर तांडा येथे ‘उमेद पशुधन आधार केंद्र’ सुरू

मराठी चित्रपटानं तंत्रज्ञानात झालेले बदल स्वीकारून आजवरची वाटचाल केली. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मराठी चित्रपटाची भव्यता वाढवणे शक्य आहे. त्यासाठीच बागुलबुवा हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्णपणे एआयद्वारे निर्मिती झालेला चित्रपट या शिवाय या चित्रपटात आणखीही काही सरप्राइजेस असणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exit mobile version