Download App

Maharashtra Shaheer : मराठी भाषा दिनीच ‘बहरला हा मधुमास’

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज 27 फेब्रुवारी म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिन’… कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. या खास दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा (Maharashtra Shahir) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.

आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील नवे गाणे ‘बहरला हा मधुमास’ हे (Baharala Ha Madhumas) गाणं रिलीज झाले आहे. बहरला हा मधुमास हे गाणं श्रेया घोषालने गायलं असून अजय अतुलने या गाण्याला संगीत दिलं आहे.

सिनेमात शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. अंकुशचा वेगळाच अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच या गाण्याच्या माध्यमातून केदार शिंदेची लेक सना शिंदे हिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळतेय.

‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणारे महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे.

Tags

follow us