Baipan Bhaari Deva सिनेमाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक; म्हणाले, ‘मराठी सिनेमाला लोक…’

Baipan Bhaari Deva: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमामधील गाणी, सिनेमामधील कलाकारांचा अभिनय चाहत्यांची मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी या सिनेमाचं चांगलच कौतुक करत आहेत. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये […]

Baipan Bhaari Deva Mahesh Manjrekar

Baipan Bhaari Deva Mahesh Manjrekar

Baipan Bhaari Deva: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमामधील गाणी, सिनेमामधील कलाकारांचा अभिनय चाहत्यांची मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी या सिनेमाचं चांगलच कौतुक करत आहेत. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे.


तसेच सहायक दिग्दर्शिका म्हणून त्यांची लाडकी लेक सना शिंदेने (sana shinde) संपूर्ण जबाबदारीची धुरा सांभाळली आहे. यावर आता अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करुन ‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केले आहे.


महेश मांजरेकर यांनी 1 जुलै दिवशी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाचे खूपच कौतुक केले आहे. ते म्हणाले आहे की, ‘मी पाहिला आहे हा सिनेमा, हा सिनेमा खूपच छान आहे. बाईपण भारी देवा म्हणजे बायकांचा सिनेमा आहे, असं तुम्हाला वाटेल. परंतु असं नाही. हा सिनेमा पुरुषांनी बघणं देखील खूप गरजेचं आहे.

चाहत्यांचे अभिनंदन कारण तुम्ही हे पटवून दिलं आहे की, मराठी सिनेमानं प्रेक्षक येत नाहीत, हे सगळं अफवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. हा परंतु एखादा चांगला सिनेमा असेल तर तुम्ही येता. ‘महेश मांजरेकर यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, ‘भारीच आहे बाबा हा सिनेमा!’

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या सिनेमात जोरदार धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Exit mobile version