Download App

Baipan Bhari Deva Review: बाईच्या मनातला मनमोकळा संवाद…बाईपण जगण्याची धमाल गोष्ट

प्रेरणा जंगम
रेटिंग- 4.5 स्टार्स

Baipan Bhari Deva Review: बायकांच्या मनात काय सुरु आहे ? हा प्रश्न कधीही न सुटणारा. पण ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva Review ) या चित्रपटातून तुम्हाला ते नीट कळू शकले. याचं कारण म्हणजे बाईच्या मनातला मनमोकळा संवाद तुम्हाला फक्त ऐकायलाच नाही तर पाहायला ही मिळले. (Marathi Movie) पण ते फक्त ऐकून आणि पाहून चालणार नाही ते समजून घेणं गरजेचं हे चित्रपटात उत्तम मांडलय. ज्यात पाहायला मिळते सहा बहिणींची गोष्ट. आई, पत्नी, बहिण, आजी, मैत्रीण आणि इतर अशा विविध नात्यातून आपण बाईपण पाहतो. बाईच्या या विविध नात्यातील पैलू या चित्रपटात सादर होताना दिसतात.

काही चित्रपट असे असतात ज्यात कास्टिंग इतकं परफेक्ट असतं की यापेक्षा परफेक्ट काय असून शकतं असं वाटतं. अशी परफेक्ट कास्ट तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा फार रंजक आणि खिळवून ठेवणारी सहा बहिणींची कथा आहे. अनेक वर्ष एकमेकिंच्या फारशा संपर्कात नसलेल्या या बहिणी मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात. या सहा बायका एकत्र आल्यानंतर कथेला मिळणार वळण मजेशीर आहे. अशीच तुफान कॉमेडी आणि त्यात भावनिक टच देणारा हा सिनेमा आहे.

मुळात चित्रपटाची स्टारकास्टच अनुभवी, दमदार आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या कुलकर्णी मोने यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. तर नुकतीच अभिनयात कमबॅक करणारी दिपा परब चौधरी आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शिल्पा नवलकर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकतात. रोहिणी हटट्गडी यांच्यासारखे अनुभवी ज्येष्ठ अभिनेत्रीही त्यांच्या अभिनयातील सहजतेने मनं जिंकतात.

वंदना गुप्ते या चित्रपटाची शान आहेत. अनेक कॉमेडी सीन आणि संवाद त्यांनी उत्तम खुलवले आहेत. त्यांच्या संवादांना लाफ्टर येतोच. सुकन्या कुलकर्णी मोने यांनी साकारलेली भूमिका हसवतेही आणि भावुकही करेल, पात्र अतिशय सुंदर पद्धतीने साकारण्यात आले आहे. सुचित्रा बांदेकरही भूमिकेतील विविध भाव उत्तम सादर करतात. दिपा परब चौधरीची भूमिकाही विविध पैलू असणारी आहे. हे पात्र तिने छान सादर केलय तर शिल्पा नवलकरनेही भूमिकेला न्याय दिलाय.

याशिवाय शरद पोंक्षे, तुशार दळवी, सुरुची अडारकर, स्वप्निल राजशेखऱ, पियुश रानडे, सतीश जोशी या कलाकारांचं कामही लक्षवेधी आहे. पण चित्रपटातील मुळ सहा नायिकांपासून नजर हटत नाही. असा कडक तगडा परफॉर्मन्स या सहा जणींनी दिला .
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बायकांच्या मनातला संवाद ‘अग्गबाई अरेच्चा’ मधून सादर केला होता. पण यावेळी हा संवदा आणखी मनमोकळा आहे.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

याचवर्षी आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ नंतर आता ते या चित्रपटातून बायकांची गोष्ट घेऊन आलेत. जेव्हा बायकांच्या मनातला सांगण्याची वेळ येते तेव्हा केदार शिंदे पेक्षा दुसरं कुणी असूच शकत नाही. कारण बाईचं मन ते पडद्यावर उत्तम पद्धतिने उलगडून दाखवतात. साई पियुश यांची गाणी, संगीत तर जमेची बाजू वाटतात. वैशाली नाईक यांनी हा चित्रपट छान लिहीलाय. चित्रपटाच्या संवादांनी तर आणखी मजा आणली आहे. वासुदेव राणे यांचं छायांकन आणि मयुर हरदासचं संकलनही छान झालं आहे. या चित्रपटात भरपुर मनोरंजनाचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. कारण यात कॉमेडी, भावनिक सीन, नाती, भांडणं, गाणी, डान्स या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा हा चित्रपट तुम्ही फॅमिलीसोबत नक्की एन्जॉय करणार आहात.

Tags

follow us