Baipan Bhari Deva Special Screening: केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva Movie) चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्स ऑफिसवर (box office) आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले, तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. (Marathi Movie) आणखी पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल, अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच! आणि म्हणूनच चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून हजरेई लावली होती. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताही हा विशेष शो हाऊसफुल ठरला होता!
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. ७६व्यां स्वातंत्र्यदिनी ७६.५ कोटीचा गल्ला २०२३ चा सुपरहीट चित्रपट ठरला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.
शनिवारी पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला तसेच चित्रपटाला एकंदरीत मिळालेल्या यशाबद्दल निर्मात्या माधुरी भोसले म्हणतात की, ” एमव्हीबी मीडियाच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्याच बरोबर मला केदार शिंदे सारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि या ६ अत्यंत प्रतिभावान आणि खास कलाकार महिलांशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचे आणि क्रूचे मनापासून खूप खूप आभार. हे खरंच विशेष आहे की प्रचंड व्यावसायिक यशासोबतच आम्ही ज्यांच्यासाठी ही फिल्म बनवली आहे त्यांच्याकडूनही तितकेच कौतुक आणि प्रेम मिळाले आहे!! धन्यवाद.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले यांच्या एमव्हीबी मिडिया या प्रोडक्शन अंतर्गत करण्यात आली असून, या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली.