Baaplyok Movie: वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन आपल्या १ सप्टेंबरला भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ (Baaplyok Marathi Movie) हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (dagadusheth ganapati) दर्शनासाठी चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीम प्रार्थना केली.
विशेष म्हणजे ‘बापल्योक’या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
बापाची ‘माया’ आपल्या कवितेतून व्यक्त करताना ‘बापल्योक’ चित्रपटातील अभिनेते शशांक शेंडे यांनी सादर केलेली ‘बाप म्हणजे काय? ‘बाप म्हणजे जगण्याचं माप आहे … पाठीवरची थाप आहे’, या आशयाची कविता सध्या चांगलीच गाजतेय. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ आगामी ‘बापल्योक’ या चित्रपटातून साधला आहे.
चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. येत्या शुक्रवारी ‘बापल्योक’ आपल्या भेटीला दाखल होत आहेत. ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.