Download App

निर्मात्यांकडून धमकी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बावरी’चा गंभीर आरोप

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मोनिका भदोरिया (Monika Bhadoriya) यांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यासह सोहिल रमानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. माझं करिअर बरबाद करण्याची धमकी देत माझा छळ केल्याचा आरोप अभिनेत्री मोनिक भदोरियाने केला आहे. याआधीही जेनिफर बन्सीवर यांनी असित मोदींवर शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर आता मोनिका भदोरिया यांनी आरोप केल्याने असित मोदी पुन्हा चर्चेत आले आहेत.

Rahul Gandhi : नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर राष्ट्रपतींनी करावे

मोनिका भदोरियाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत 2013 ते 2019 दरम्यान, ‘बावरी’ची भूमिका साकारली. शो सोडल्यानंतर मोनिका यांना असित मोदी यांनी पैसे दिले नव्हते. अशा अडचणीचा सामना गुरचरण सिंह, जेनिफर मिस्त्री, राज अनाडकट आणि शैलेश लोढा यांनाही करावा लागला होता.

हवाई दलाचा मोठा निर्णय; वारंवार होणाऱ्या अपघातानंतर MIG-21 च्या उड्डाणावर बंदी

मोनिका भदोरिया यांनी असित मोदींना ‘मोठा खोटारडा’ असं संबोधून संताप व्यक्त केला आहे. मोनिका म्हणाल्या, असित मोदी आणि सोहेल रमानी सेटवर कलाकारांचा नेहमीच अपमान करतात. माझा इतका छळ केला की, मालिकेत काम करण्यापेक्षा आत्महत्या करणे चांगले, असं त्या म्हणाल्या आहेत. असित मोदी यांनी माझा मानसिक छळ केला आहे. ते मला ओरडायचे शिवीगाळ करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात

तसेच सोहिल रमानी यांनी आम्ही तुम्हाला पैसे देतो त्यामुळे आम्ही जे सांगू ते करावं लागणार असल्याचं मोनिका भदोरायांनी म्हटलं आहे. मुंबईत तू काम करु नको, नाहीतर तुझं करिअर बरबाद करुन टाकणार असल्याची धमकी दिली होती. असित मोदींमुळे माझ्या कामावर परिणाम झाला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, टीव्ही शो असूनही मालिकेत काम करणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी मानधन दिले जात असल्याचाही आरोप मोनिका भदोरिया यांनी केला आहे.

Tags

follow us