Download App

Jawan: किंग खानच्या जवानमधील सुमित अरोराच्या संवादाने घातली प्रेक्षकांना भुरळ!

Jawan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Social media) गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ग्रँड ओपनिंग तर केलीच पण रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.


सध्या सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना चित्रपटातील संवाद चांगलेच गाजताना बघायला मिळतात. (Sumit Arora) ‘जवान’मधील डायलॉग, संवाद लेखक सुमित अरोरा याने लिहिले आहेत. सिनेमातील एका विशिष्ट संवादाने चाहत्यांना चांगलेच वेड लावले आहे. “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर,” या खास डायलॉगने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

चित्रपटाच्या फॅन्सने सोशल मीडियावर हॅशटॅग आणि पोस्टर्स तयार करून या आयकॉनिक संवादाला अनोखा दर्जा दिल्याचे बघायला मिळत आहे. सुमित अरोरा याने शाहरुख खानसोबत संवादांवर काम कसे केले आणि त्याने हे डायलॉग कसे लिहिले हे तो सांगत आहे.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

कोण आहे सुमित अरोरा?

सुमित अरोरा मनोरंजनाच्या जगासाठी अनोळखी नाही. त्यांनी अलीकडच्या सुपरहिट चित्रपटासाठी आणि मालिकांसाठी संवाद लिहिले आहेत. स्त्री, द फॅमिली मॅन आणि दहाड या दमदार प्रेक्षकांना हसवणाऱ्या रडवणाऱ्या आणि आनंदी करणाऱ्या आकर्षक प्रोजेक्ट्ससाठी त्याने लिखाण केले.

‘जवान’ चे हिंदी संवाद लिहिणारा लेखक सुमित अरोरा मेरठचा आहे. ‘दहाड’ आणि ‘गन्स अँड गुलाब’ सिरीजच्या यशानंतर त्याला ‘जवान’ सारखा प्रोजेक्ट हाती आला. हा त्याचा पहिलाच हाय प्रोफाईल प्रोजेक्ट होता. तसेच सिनेमासाठी संवाद लिहिणं फारच मजेशीर होतं. कारण मला शाहरुखचा स्टारडम डोक्यात ठेवून ते संवाद लिहावे लागणार होते. हे माझ्यासाठी आतापर्यंत सर्वात कठीण आणि मनोरंजक काम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us