Download App

Bhushan Kadu: ‘हास्यजत्रा शोची मनाविरुद्ध एक्झिट’, अभिनेत्याने सांगितला खडतर काळातील प्रसंग

Bhushan Kadu : प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या अभिनेत्यावर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू केली. शो का सोडला याचे कारण सांगितले.

Bhushan Kadu: ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ (Comedy Express) या मराठी शोमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu). आजवर त्याने अनेक चित्रपट, व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं आहे. भूषण सध्या मनोरंजन विश्वात काम करत नसल्याचे दिसत आहे. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्याने मनोरंजन (entertainment) इंडस्ट्रीतून एक्झिट घेतली. त्याच्या बायकोचं देखील गेल्या काही वर्षांपुर्वी निधन झालं. यामुळे भूषण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये अतिशय कठीण परिस्थीचा सामना करत आहे. अशातच एका मुलाखतीमध्ये बोलताना भूषणने त्याला आलेले धमक्यांचे फोन आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra ) मधून झालेली एक्झिट याविषयी पहिल्यांदाच भाष्य करताना दिसत आहे.


भूषणने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला आहे की, भूषणने एका व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेतले होते. पुढे तो व्यक्ती कायम माझ्या मागे पैशांसाठी लागायचा. मात्र मला जसं जमेल तसं पैसे मी देत असायचो. पण पुढे हव्यासापोटी तो व्यक्ती सततच माझ्या मागे लागायला लागला. त्यामुळे या गोष्टींचा मला प्रचंंड त्रास होत असायचा, असे अभिनेत्याने यावेळी सांगितलं आहे.

पुढे म्हणाला की, त्यावेळी मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचं शूटींग करत होतो. आणि इतर व्यावसायिक नाटकामध्ये देखील मी कामं करत होता. मात्र काम करत असताना अचानक सेटवर कोणी अनोळखी माणूस दिसला तर मला धास्ती भरायची. हा व्यक्ती माझ्याकडून पैशांची वसूली तरी करायला आला नाही का? असं मला सतत वाटायचं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचे निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे कलाकारांचं कधी मानधन चुकवले नाहीत ते वेळेतच करत असायचे. पण कोरोना काळात गोस्वामींना कोरोना झाल्याने ते होम क्वारंटाईन झाले होते. आणि त्यावेळी आमचं थोडसं पेमेंट थांबलं. त्यामुळे मला प्रचंड मोठा आर्थिक गोष्टींचा त्रास झाला. आणि त्याचवेळी मला बीपीची समस्या निर्माण झाली. आणि एकदा चक्कर येऊन सेटवरच पडलो. त्यावेळेस कसतरी करून काही मित्राशी संपर्क साधून बोलावून घेतलं. आणि मला रिक्षाने हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले.

Box Office: श्रीकांतची सहाव्या दिवशी बंपर सुरुवात; मोडला ’12वी फेल’च्या कमाईचा रेकॉर्ड

डॉक्टरांनी सांगितलं की, जास्त स्ट्रेस आणि प्रेशरमुळे मला हा त्रास जाणवत आहे. परिणामी मला ब्रेन हॅमरेज देखील होण्याची शक्यता आहे. पुढे म्हणाला की, काही मित्रांना सांगून माझा मोबाइला ऑफ केला. हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्याने मला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या शूटींग देखील जाता येत नव्हतं. आणि कलाकाराची पाठ फिरली की त्याच्यामागे चर्चा सुरु होत असतात. असंच माझ्या विषयी देखील काहीसं घडलं. कोणीतरी अफवा पसरवली की मी दार पिऊन कुठेतरी पडला असेल, किंवा त्याला दुसरं काम मिळालं असेल अशी चर्चा त्यावेळेस रंगत होती. या सर्व घटनांमुळे मला आणखीनच मनाविरुद्ध शो सोडावा लागला, असं यावेळी अभिनेत्याने खुलासा केला आहे.

follow us

वेब स्टोरीज