Bigg Boss 17 : बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) या रिअॅलिटी शोमध्ये शो सुरू झाल्यापासून चर्चा आहे ती म्हणजे पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची. त्यात अंकितासोबत पत्नीनंतर एक स्पर्धक म्हणून विकी जैनची जी अनोखी केमिस्ट्री आहे. त्यामुळे त्याला लाईम लाईटमध्ये आणले आहे. तर दुसरीकडे अंकिताने थेट चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) मनात देखील घर केलं आहे आणि भाईजानने याच कौतुक देखील केल्याचे बघायला मिळाले आहे.
विकी आणि अंकिताची अनोखी केमेस्ट्री !
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि शोमध्ये देखील विकी जैन आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे दोघे एकेमकांना आधार देणारे म्हणून ओळखले जात आहेत. बिग बॉस 17 च्या घरात या दोघांच्या चर्चा होताना दिसतात. या पॉवर कपलच्या खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. हे दोघे एकमेकांसाठी कायम उभे असतात हे दिसून आल आहे.
चक्का जाम होणार! ‘पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या’ : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम
नुकतच विकी जैन हा स्पर्धक अभिषेक कुमारशी सामना करताना दिसला ज्याने नुकत्याच एका एपिसोडमध्ये अंकिता लोखंडेचा अपमान केला होता. तो आपल्या पत्नीवर किती प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो हे त्याच्या ठाम भूमिकेमुळे स्पष्ट होते. या कार्यक्रमामध्ये केवळ विकीवर अंकितावर किती प्रेम करतो हेच दिसत नाही. तर बिग बॉसच्या घरात जेव्हा काही घडते. तेव्हा हे जोडपे एकत्र कसे उभे राहतात? हे देखील दिसते.
रामायण, महाभारत अन् राज्यघटना : विद्यार्थ्यांना ‘देशभक्त’ बनविण्यासाठी NCERT चा मास्टरप्लॅन!
तर शोमध्ये विकीने ज्या प्रकारे अंकिताचा बचाव केला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जोडप्याची प्रशंसा केली. विकी आणि अंकिता एकमेकांच्या किती जवळ आहेत? ते एकमेकांचा किती आदर करतात? हे या काळजी प्रेम आणि बॉडिंगमुळे दिसून येते. त्यामुळे चाहते या रिअॅलिटी शोमधील त्यांच्या शेवटपर्यंतच्या प्रवासाचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत.