Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
25 नोव्हेंबर रोजी एल्विशला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हा फोन वजिराबाद गावाजवळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. एका अनोळखी फोनद्वारे एल्विश यादवकडून 1 कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. हा फोन नेमका कोणी केला? याबद्दल अद्याप कोणती माहिती मिळाली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एल्विश यादव हा एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहे. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यानं एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेल्यापासूनच एल्विशची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या ‘सिस्टीम’च्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता एल्विश यादवला गाण्यांपासून ते अनेक सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत.
Koffee With Karan: 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ Viral
एल्विशनं आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमेडी व्हिडीओ बनवून लोकांची मनं जिंकत असल्याचे बघायला मिळत आहे. YouTube वर त्याचे अंदाजे 14.5 मिलियन सब्सक्रायबर आहेत. 29 एप्रिल 2016 रोजी एल्विशनं YouTube च्या जगात आपलं पाऊल ठेवलं. पण त्याच्या करिअरसाठी बिग बॉस OTT 2 चा विजेता बननं हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता.