21st Third Eye Asian Film Festival : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने (Black Dog) उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा पडणार (Entertainment News) आहे. प्रेक्षकांना 60 हून अधिक देशी विदेशी चित्रपटांची मेजवानी मिळणार (21st Third Eye Asian Film Festival) आहे. हा गुआन हू दिग्दर्शित एक चिनी चित्रपट आहे. या चित्रपटात एडी पेंग आणि टोंग लिया यांनी भूमिका केल्या आहेत. तो 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 18 मे 2024 रोजी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. जिथे त्याला अन सर्टेन रिगार्ड पुरस्कार मिळाला.
पुणे : मला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचयं अन् पुढच्या मिनिटाला अजितदादांनी खटका उडवला
आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेलाआणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाने 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना गौरविण्यात येणार आहे. अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात महोत्सवाचा शुभारंभ 10 जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.‘21 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ 10 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे रंगणार आहे.
पुणे : मला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचयं अन् पुढच्या मिनिटाला अजितदादांनी खटका उडवला
हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. पण आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने आम्ही अनेक उत्तम चित्रपट या महोत्सवात दाखवणार आहे, असं फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सांगितले.