Ayushmann Khurrana Visit Gurudwara : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आयुष्मान त्याच्या अभिनयासोबतच आपल्या गायन कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. व्हिडिओ जॉकी ते गायक आणि अभिनेत्यापर्यंतचा आयुष्मानचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यमान सतत आनंदी असतो. नुकतंच त्याने त्याच्या आनंदी जगण्याची प्रेरणा सांगितली.
Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गीतांजली कुलकर्णीच्या ‘या’ सिनेमाची बाजी
नुकताच आयुष्यमान मुंबईतील एका गुरूद्वारात गेला होता. यावेळी त्यांने गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं. त्याच्यासोबत छायाचित्रकार सुतेजसिंग पन्नू देखील होते. गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेलत्यानंतर सुजेतसिंग पन्नू यांनी अभिनेता आयुष्मानला एक साधा प्रश्न विचारला. ‘तुम्ही आनंदी कसे राहता?’ या प्रश्नावर बोलतांना आयुष्मान म्हणतो, मला दोन गोष्टी कळल्या – एक म्हणजे संयम ‘जतन’ आणि कृतज्ञता ‘सूक्त’. मी नेहमी या 2 गोष्टी लक्षात ठेवतो . जेव्हा जेव्हा मला तणाव वाटतो, तेव्हा मी स्वतःला आठवण करून देत राहतो की आपलं हृदय कृतज्ञतेने भरलेलं पाहिजे, असं आयुष्मान सांगतो.
Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गीतांजली कुलकर्णीच्या ‘या’ सिनेमाची बाजी
दरम्यान, आयुष्यमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुतेजसिंग पन्नू यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, तुमच्या आंतरिक शांतीला प्राधान्य देणे ही आनंदानं जगण्याची पहिली पायरी आहे. आत्मिक शांतीच तुम्हाला बाह्य शांततेकडे नेईल. कुठल्याही गोष्टीला प्रेमाने आणि स्वीकृतीने प्रतिसाद द्या, असं लिहिलं.
व्हिडिओच्या शेवटी सुतेज यांनी त्यांच्या ट्रेडमार्क शैलीत आयुष्ममानला या सुंदर क्षणाची आठवण म्हणून गुरुद्वारामध्ये आयुष्मानचा क्लिक केलेला एक फोटो भेट दिला.
‘अंधाधुन’, ‘बधाई दो’, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे आयुष्मानचे प्रसिध्दीच्या झोतात आला होता. ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात त्याने साकारलेली वेगळी आणि गंभीर भुमिका साकारली होती. दरम्यान, त्याचे चाहते त्यांच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.