Download App

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगनाने हिमाचल सरकारला सुनावलं!  

Kangana Ranaut: बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. परंतु आता मात्र आणखी एका कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. (Social media) तिने हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघायला मिळत आहे.


यामुळे अनेक कुटुंबिय हे रस्त्यावर आले आहे. या घटनेमुळे अभिनेत्री कंगनाने पुढाकार घेत 5 लाख रुपयांची मदत पुरग्रस्त कुटुंबाना केली आहे. तसेच निधी दान करण्यात अडचण येत असल्याने कमी मदत केल्याचे देखील तिने यावेळी सांगितले आहे. यावरुन तिने हिमाचल सरकारला चांगलच सुनावलं आहे. याबाबत कंगनाने ट्विट करत सांगितले आहे की, “माझ्या टीमने मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 50 ते 60 वेळा पैसे टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी काही रक्कम देखील दान करू शकली.


मला फक्त 10 लाख रुपयांची मदत करायची होती. राज्य सरकार साधं आपत्ती निवारण निधी विभाग देखील व्यवस्थित चालवू शकत नसल्यामुळे ती सरकारला चांगलच धारेवर धरली आहे. ही अत्यंत शरमेची बाब आहे. तसेच कंगनाने सीए मनोजचे व्हॉट्सअॅप चॅटिंग देखील सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल सांगितले आहे. तसेच कंगनाने मुख्यमंत्री सहायता निधीतील तांत्रिक बिघाडाचा मुद्दा उपस्थित करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कंगनाच्या अगोदर देखील अभिनेता आमिर खान देखील हिमाचल सरकारला २५ लाख रुपयांची मदत केली होती.

Hardik Joshi: राणादाचा नवा सिनेमा ‘क्लब 52 ‘या’ दिवशी करणार धमाल

कंगना ही मुळची हिमाचलमधल्या मंडी जिल्ह्यामधील आहे. कंगनाबद्दल सांगायचं झालं तर तिचा ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तसेच तिचा ‘तेजस’ हा आगामी सिनेमा 27 ऑक्टोबर दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ‘इमरजेंसी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मुख्य भूमिकेमध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. या सिनेमात तिच्याबरोबर श्रेयस तळपदे, अनुपम खेर, सतीश कौशिक, महिमा चौधरी असे दिग्गज कलाकार बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us