Download App

Kangana Ranaut: कंगनाचं ठरलं! लवकरच बोहल्यावर चढणार, कोण असणार अभिनेत्रीचा पती?

Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. परंतु आता अभिनेत्री लग्न करणार अशी चर्चा रंगत आहे. यावर स्वतः कंगनाने मोठं गौप्यस्फोट केलं आहे.


नुकताच झालेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान अभिनेत्री लग्नाच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेत्री सांगितलं आहे की, मी एक फॅमिली पर्सन आणि मी लवकरच लग्न करेल… स्वतःचं कुटुंब असावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मला पण असंच वाटतं.. कुटुंब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला माझं स्वतःचं कुटुंब हवं आहे आणि ते मि 5 वर्षांमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.

कंगनाला पुढे, ‘लव्ह मॅरिज करणार की, कुटुंबाच्या इच्छेने लग्न करणार?’ असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर कंगनाने थेटच सांगितलं आहे की, ‘दोन्ही प्रकारे असायला हवं…’ एवढंच नाही तर, यावेळी कंगनाने तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपविषयी देखील वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे की, ‘प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तुम्हाला यश मिळणार असं काही नाही… पण मी माझ्या प्रत्येक रिलेशनशिपमध्ये माझं बेस्ट दिलं आहे. कंगना हिचं नाव आदित्य पंचोली, अध्ययन सुमन आणि हृतिक रोशन या कलाकारान सोबत देखील जोडण्यात आल्याचे बघायला मिळाले होते. हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री अनेकवेळा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अनेक सेलिब्रिटींसोबत असलेल्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री कधी आणि कोणासोबत लग्न करणार याबद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. परंतु अभिनेत्री एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा एका प्रसिद्ध अभिनेत्याने केला आहे.

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल

पंगा क्विन एप्रिल 2024 मध्ये बोहल्यावर चढणार असल्याचा दावा अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला होता. केआरके ट्विट करत म्हणाला, ‘अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर 2023 मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. आणि एप्रिल 2024 मध्ये कंगना बोहल्यावर चढणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ यावर अद्याप कंगनाने कोणत्याही प्रकारचा खुलासा केली नाही.

कंगना रनौत लवकरच आगामी ‘तेजस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 27 ऑक्टोबर दिवशी ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात कंगना फायटर पायलट तेजस गिल यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Tags

follow us

वेब स्टोरीज