Download App

Sunny Leone: जागतिक संगीत दिनानिमित्त अभिनेत्री वाजवणार डीजे, लखनऊमध्ये करणार लाइव्ह परफॉर्म

Sunny Leone DJ Live Lucknow Perform: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone)कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने जोरदार चर्चेत असते.

Sunny Leone DJ Live Lucknow Perform: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone)कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने जोरदार चर्चेत असते. पण, यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण काही वेगळेच आहे. आता अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांचे मनोरंजन करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त (World Music Day) ही अभिनेत्री डीजे विश्वात पदार्पण करणार आहे.


21 जून रोजी लखनऊमध्ये (Lucknow) परफॉर्म करणार असून सनी ( Sunny Leone) फिनिक्स पॅलासिओ येथे होणाऱ्या खास एकदिवसीय कार्यक्रमात डीजे बनणार आहे. (Hindi films) चाहत्यांना सनीला तिच्या खास लूकमध्ये बघायला मिळणार असून सनीची ही बाजू देखील अनुभवयाला मिळणार आहे.

याआधी देखील हिंदी चित्रपटांतील आयटम साँग प्रेक्षकांचे मनोरंजन केली आहे. हेलन आणि बिंदू सारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या डान्स नंबरने चित्रपट हिट केलेत. आजही चित्रपटांमध्ये हा जोरदार ट्रेंड सुरू आहे आणि दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक आयटम साँग पाहायला मिळाले आहे. पण आज बॉलिवूडमध्ये सर्वात महागडी डान्स नंबर करणारी अभिनेत्री म्हणून ओळखले जात आहे.

Malhar Trailer: नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

सनी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. ती ‘कोटेशन गँग’ मधून तामिळ पदार्पण करणार आहे आणि सध्या ती स्प्लिट्सविला X5 होस्टिंग टेलिव्हिजनवर दिसत आहे. ती ओटीटीवर ग्लॅम फेम जज करतानाही दिसणार आहे. तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमियासोबत एक शीर्षकहीन चित्रपट आहे आणि पाइपलाइनमधील अनेक प्रकल्प आहेत जे लवकरच उघड होणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज