Download App

ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर

Bollywood ED Raid : राजकारणी नेत्यांवर कारवाई करत त्यांना जंग जंग पछाडणाऱ्या ईडीने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडावर आले आहेत. ईडीने धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापे टाकले. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईने बॉलिवूडकरांचे धाबे दणाणले आहे.

सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम

ईडीच्या या छापेमारीमुळे अनेक सेलिब्रिटी जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेता टायगर श्रॉफ अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. या बेटिंग अॅपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशीही सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने 39 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये कोलकाता, रायपूर, छत्तीसगड, भोपाळ येथेही छापे टाकण्यात आले. ही कारवाई महादेव बेटिंग अॅपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत एकूण 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

या बेटिंग अॅपच्या माध्यमातून परदेशात काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवून सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. या मंडळींना रोख रकमेद्वारे मानधन देण्यात आले होते. हे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय आहे. आतापर्यंत या प्रकरणात 14 सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. अनेक सेलिब्रिटी या इव्हेंटसाठी परदेशात गेले होते. त्यामुळे आता पुढील काळात या लोकांना चौकशीला सामोरे जावे लागू शकते. या मंडळींना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता या कारवाईतून आणखी काय माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत

Tags

follow us