Download App

Aata Vel Zali: अनंत महादेवनच्या ‘आता वेळ झाली’ सिनेमाला बॉलिवूडकरांनी दिल्या शुभेच्छा

Bollywood Stars Gives Greeting Messages: अनंत नारायण महादेवन (Anant Mahadevan) दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zali Movie) हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ (Marathi Movie) या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इच्छामरण या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. म्हणूनच प्रेक्षकांसह या चित्रपटाबद्दल बॉलिवूडकरांनीही आपली मते व्यक्त केली आहेत.

या सिनेमाला अनेकांनी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ड्रिमगर्ल’ हेमामालिनी यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलचे महत्व अधोरेखित करत अनंत महादेवन, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर नाना पाटेकर, सुचित्रा पिल्लई, दिग्दर्शक अब्बास मुस्तान, सुहासिनी मुळ्ये, आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी यांनीही चित्रपटाला शुभेच्छा देत, चित्रपट पाहाण्याचे आवाहन केले आहे. तर इतरही अनेक कलाकारांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हा मराठी सिनेमा सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर आपल्याला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट आल्यावरच कळणार आहे. दरम्यान, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया,अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल , जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.

Aata Vel Zali: ‘इच्छामरण विषयावर भाष्य करणारा’, अनंत महादेवन यांचा ‘आता वेळ झाली’ची घोषणा

चित्रपटाबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणतात,” जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले. जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहाण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल.’’

डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेल झाली’ची यापूर्वीच निवड झाली आहे.

follow us