Download App

Boys 4 : ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र; बॅाईज 4 मधील आणखी एक गाणं रिलीज…

Boys 4 : बॅाईज, (Boys 4 ) बॅाईज 2 आणि बॅाईज 3 मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांना चांगलच माहित आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्टामध्ये जोरदार धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे लोक धुमाकुळ घालायला सज्ज झाले आहेत. त्यात आता ट्रेलर, काही गाण्यांनंतर आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

69 th National Film Awards मधील यशानंतर सुजीत सरकारकडून अमेरिकेतून टीमचं अभिनंदन!

आता ‘बॅाईज 4’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत आणि बोल लाभले आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने हे गाणे अधिकच जल्लोशमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक पार्टीत हे गाणे नक्कीच वाजणार.

‘अजित पवारांच्या मुख्यमंत्री करायचे होते की नाही, याचे उत्तर शरद पवारांकडे’

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २० ऑक्टोबरला ‘बॅाईज ४’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

Tags

follow us