Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र २’ अन् ३, ‘या’ वर्षी होणार रिलीज, पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाचा खुलासा

Brahmastra : गेल्या वर्षी आलेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलीया भट्टच्या (Alia Bhatt) ब्रम्हास्त्रने (Brahmastra ) बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या उर्वरीत २ भागांची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाचे दोन भाग हे दुसरा हा डिसेंबर २०२६ आणि […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 04T171909.669

Brahmastra

Brahmastra : गेल्या वर्षी आलेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलीया भट्टच्या (Alia Bhatt) ब्रम्हास्त्रने (Brahmastra ) बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या उर्वरीत २ भागांची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाचे दोन भाग हे दुसरा हा डिसेंबर २०२६ आणि तिसरा भाग हा डिसेंबर २०२७ ला प्रदर्शीत करणार असल्याचे सांगितले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने याबाबतची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केली आहे. सप्टेंबर २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट पहिल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या हीट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन मोठी चर्चा झाली, काही मतभेद देखील समोर आले होते. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटात रणबीर- आलियाची केमिस्ट्री सर्वांना मोठ्या प्रमाणात आवडली होती.


या चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादावर या चित्रपटाचे पुढील भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. तर आता अखेर या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ‘ब्रम्हास्त्र ३’बद्दल मोठी घोषणा केली. कोरोनानंतर सर्वात मोठी कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा पहिला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरला आहे.

‘Yentamma’ गाण्यावर थिरकला सल्लू भाई; पाहा गोल्डन भाईजानचा धुमाकूळ घालणारा व्हिडिओ

रणबीर कपूर, आलिया भट्टबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाचा पुढील भाग २०२५ साली प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण आता अयान मुखर्जी याने या चित्रपटाच्या पुढील भागाविषयी त्याचा प्लॅन उघड करत ब्रह्मास्त्र २ आणि ब्रम्हास्त्र ३ कधी प्रदर्शित होणार हे सांगितले आहे.

Exit mobile version