ND Studio Carnival : कर्जत-खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये आयोजित केलेल्या कार्निव्हल आजपासून थाटात सुरू झाला. विशेष मुलांनी उद्घाटन केल्यानंतर उत्साहाच्या वातावरणात कार्निव्हलचे मुलाखतीतील पहिले पुष्प गुंफले गेले. अभिनेत्री कविता लाड यांच्या चित्रपट-नाट्य सृष्टीतील अनुभवांच्या आधारावर झालेली मुलाखत रंगली.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्गत कार्यरत असलेल्या एन.डी.स्टुडिओ येथे आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत कार्निव्हल आयोजित करण्यात आला असून पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक पर्यटकांनी कार्निव्हलला हजेरी लावली होती. आजच्या उदघाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर, मुख्यलेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांची विशेष उपस्थिती होती.
३१ तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या कार्निव्हलमध्ये पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ ९९९, १४९९ ( जेवणासह) रुपये कार्निवलचे तिकीट असून, एकाचवेळी २५ आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास १३९९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworld या संकेतस्थळावर व स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध आहे.
कलाकारांची मांदियाळी
सुव्रत जोशी व सखी गोखले : २६ डिसेंबर, दु. ४ ते ६
अदिती सारंगधर : २७ डिसेंबर, दु. ४ ते ६
विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड : २८ डिसेंबर, दुपारी १२ वाजता
आनंद इंगळे : २९ डिसेंबर, दु. ४ ते ६
डॉ. गिरीश ओक, ३० डिसेंबर, दु. ४ ते ६
संजय मोने : ३१ डिसेंबर, दु. ४ ते ६
Bangladesh Violence : दिपू दासनंतर, बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या
या कलाकारांसोबत गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.
