Download App

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

International Yoga Day: दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. योग केल्याने मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडतो. म्हणूनच मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रिटी मंडळीही नियमित योगा करतात. आंतरराष्ट्री योग दिनानिमित्ताने काही सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावर खास पोस्ट केले आहेत, चला तर मग पाहुयात त्यांनी काय काय शेयर केले आहे.

अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी योग दिनानिमित्त सोशल मिडीयावर खास व्हिडीओ शेयर केला आहे. यानिमित्ताने त्यांनी योगासन करतानाचा व्हिडीओ केला आहे. ज्यात योगचे महत्त्वही त्यांनी समजावून सांगितले आहे. संतुलन कायम ठेवण्यासाठी योग महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.


तर दरवर्षीप्रमाणे अभिनेत्री प्राजक्ता माळीने योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार घातले आहेत. दरवर्षी योग दिनानिमित्त प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन सूर्यनमस्कार करते. यंदाही तिने तब्बल 108 सूर्यनमस्कार घातले आहेत.


अभिनेत्री दिपाली सय्यदने ही योग करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.


अभिनेत्री माधवी निमकरनेही योगासनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


यासह अभिनेत्री भाग्यश्री मोटे, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी या आणि इतर अभिनेत्रींनी देखील योग दिनानिमित्ताने योगासने केले आहेत, आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत योग करण्याचा संदेश दिला आहे. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी देखील योग दिनानिमित्त योग साधना करतानाचे फोटो शेयर करत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयावर योग दिन उत्साहात साजरा करत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकास जैन आणि आईसोबत योगासन केले आहे. त्याचा व्हिडीओही शेयर केला आहे.


योग म्हटलं की बॉलीवुडमधील एका अभिनेत्रीचं नाव कायम समोर येतं. ती म्हणजे फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी. योग दिन आहे आणि शिल्पा शेट्टी सोशल मिडीयावर पोस्ट करणार नाही हे शक्य नाही. शिल्पानेही मग योग दिनानिमित्त खास योगमंत्र सांगितला आहे. योगाचं महत्त्व पटवून दितर आहे. आणि योगासन करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे.


तर करिना कपूर खानने सैफ आणि मुलांचा योग करतानाचे फोटो शेयर केले आहेत, तेव्हा योग दिनानिमित्ताने सेलिब्रिटींनी योगाचे महत्त्व सांगत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.

Tags

follow us