Download App

Chandu Champion: कार्तिक आर्यन स्टारर ‘चंदू चॅम्पियन’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल प्रदर्शित

Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे.

Chandu Champion OTT Release Date:  कार्तिक आर्यनचा (Karthik Aaryan) ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion ) चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार व्यवसाय केला आणि यासोबतच कार्तिक आर्यनच्या हिट लिस्टमध्ये आणखी एक चित्रपट जोडला गेला. ‘चंदू चॅम्पियन’च्या कथेसोबतच प्रेक्षक अभिनेत्याच्या अभिनयाचेही कौतुक करताना दिसले. पडद्यावर धमाल करणाऱ्या या चित्रपटाचे चाहते ओटीटीवर (OTT ) प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


‘चंदू चॅम्पियन’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 73.5 कोटी रुपयांचा आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर 87.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट पाहिला नाही ते ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत त्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे.

ओटीटीवर ‘चंदू चॅम्पियन’ कधी रिलीज होणार

कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आधीच भाड्याने उपलब्ध आहे. आता पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये त्याच्या फ्री स्ट्रीमिंगशी संबंधित तपशीलही समोर आला आहे. कार्तिक आर्यनचा चित्रपट आता 9 ऑगस्ट 2024 रोजी ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे. ‘चंदू चॅम्पियन’ फक्त अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाईल.

Chandu Champion Review: चंदू कसा बनला चॅम्पियन? वाचा, कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चा मूव्ही रिव्ह्यू

चित्रपटाची कथा आणि स्टार कास्ट

‘चंदू चॅम्पियन’ हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. कार्तिक आर्यन स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. कार्तिकशिवाय ‘चंदू चॅम्पियन’मध्ये विजय राज, भुवन अरोरा, पलक लालवानी आणि ॲडोनिस कपसालिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कार्तिक आर्यन वर्क फ्रंट
वर्क फ्रंटवर, कार्तिक आर्यन आता ‘भूल भुलैया 3’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीही दिसणार आहे.

follow us