Download App

‘बरेली के बाजार’ मध्ये नुसरतच्या ठुमक्यांवर श्रीनिवास फिदा, छत्रपतीचं नव गाणं रिलीज

Chatrapathi Movie New Song : तेलुगु अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. ‘छत्रपति’या चित्रपटातून त्याचं हे पदार्पण होणार आहे. हा चित्रपट प्रभास स्टारर आणि एसएस राजामौलींच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘छत्रपति’चित्रपटाचा रिमेक असणार आहे. आता हा चित्रपट हिंदीमध्ये येणार आहे. त्याचं दिग्दर्शन व्ही व्ही विनायक यांनी केलं आहे.

या चित्रपटामध्ये तेलुगु अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवाससोबत अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. त्यांनंतर आता चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा आणि श्रीनिवास बेलमकोंडा या गाण्यावर धमाल करताना दिसत आहेत. ‘बरेली के बाजार’ असं या गाण्याचं नाव आहे.

लेंहेंग्यातील सोनाक्षीचा बोल्ड अंदाज…

हे गाणं सुनिधी चौहान आणि नकाश अज़ीज़ यांनी गायल आहे. तर त्याला संगीत हे तनिष्क बागची यांनी दिलं आहे. आणि मयूर पुरी यांनी हे गाणं लिहिलं आहे. हे गाणं एक एटम सॉंग आहे. यामध्ये नुसरत आणि बेलमकोंडा आकर्षक आणि स्टाइलिश दिसत आहे.

हिंदीमध्ये या चित्रपटाचं दिग्दर्शन व्ही व्ही विनायक यांनी केलं आहे. तर वी. विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाचे लेखक आहेत. डॉ. जयंतीलाल गड़ा (पेन स्टूडियोज) प्रस्तुत करते आहेत. तेलुगु अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवाससोबत अभिनेत्री नुसरत भरूचासह या चित्रपटात भाग्यश्री, शरद केळकर आणि करण सिंह छाबरा ही दिसणार आहेत. 12 मे 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us