Download App

दमदार अ‍ॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट; ‘छत्रपती’ चा टीझर पाहिलात का?

Chatrapathi : अभिनेता प्रभासचा छत्रपती (Chatrapathi) हा तेलुगू चित्रपट २००५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी केलं होत. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक रिलीज होणार आहे. या रिमेकमध्ये अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा प्रमुख भूमिका साकारलेली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमधील जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन अनेकांचे लक्ष वेधले आहे.

छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव देखील छत्रपती हेच राहणार आहे. छत्रपती या चित्रपटाच्या माध्यमातून बेल्लमकोंडा श्रीनिवास हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच छत्रपती चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या टीझरची सुरुवतीला ‘अपने लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो औरों के लिए जीता है उसे छत्रपती कहते है’ असा डायलॉगानी सुरुवात करण्यात आली आहे. टीझरमध्ये बेल्लमकोंडा श्रीनिवासचा डॅशिंग अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.


हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार

छत्रपती या चित्रपटात बेल्लमकोंडा श्रीनिवासच्याबरोबरच नुसरत भरुचा, साहिल वैद, अमित नायर, राजेंद्र गुप्ता, शिवम पाटील, स्वप्नील, आशिष सिंग, मोहम्मद मोनाजीर, आरोशिका डे, वेदिका, जेसन हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

Meena Kumari : …म्हणून मीना कुमारीच्या मृत्यूनंतर नरगिस म्हणाल्या ‘मौत मुबारक हो’

कधी होणार रिलीज?

छत्रपती चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन व्ही.व्ही.विनायक हे करत आहेत. तर जयंतीलाल गडा यांचे पेन स्टुडिओज या चित्रपटाचे निर्मिते आहेत. १२ मे २०२३ रोजी छत्रपती चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे. पोस्ट- प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे.

तनिष्क बागची या चित्रपटाचे संगीतकार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की नाही ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे. अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) हा तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. बेल्लमकोंडा श्रीनिवासनं अल्लुदु अधुर्स, सीता, अशा अनेक तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं. आता त्याच्या छत्रपती या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us