Download App

छावातील ‘त्या’ सीन्सवर कान्होजी-गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; दिग्दर्शक उतेकरांनी मागितली माफी

Chhavaa चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक उतेकरांनी माफी मागितली

  • Written By: Last Updated:

Chhavaa Director Lakshman Utekar apology to descendants of Shirke : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्र गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यावर त्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक उतेकरांनी त्यांची माफी मागितली आहे. एक फोन कॉल करत त्यांनी ही माफी मागितली.

रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत ‘उदय’ होणार ? थेट मंत्र्यांनीच मुलाचा वाढदिवस साजरा केलाय

यावेळी उतेकर म्हणाले की, शिर्के कुटुंबाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो. पण चित्रपटाच्या सुरूवातीला आम्ही डिसक्लेमर दिले आहे की, हा चित्रपट पुर्णपणे शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे. त्यात लेखक दिग्दर्शक म्हणून मी कोणतेही बदल केले नाही. त्यामध्ये कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्याबाबत जशी माहिती आहे. तसेच मी चित्रपटामध्ये दाखवले आहे.

मुलं वडिलांचे जुने फोटो पाहून रडतात, शाळेत जात नाहीत; महादेव मुंडेंच्या पत्नीने धसांसमोर मांडली व्यथा

त्याचबरोबर संभाजी महाराजांवर जी सिरीअल आली होती. त्यातही शिर्केंबाबत तसचं लिहीलं होतं. या चित्रपटामध्ये पुर्ण नाव आणि गावाचा देखील उल्लेख केलेला नाही. तसेच मी हा चित्रपट पैसे कमावण्यासाठी केलाच नाही. तरीही तुमचं मन दुखावलं असेल तर मी तुमची माफी मागतो. त्यावर शिर्केंचे वंशज म्हणाले की, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सात दिवस अगोदर आम्ही त्यात काही आक्षेपार्ह काही असेल तो चित्रपट आम्हाला दाखवण्यात यावा म्हणून नोटीस पाठवली होती. त्यावर तुम्ही का नाही काही उत्तर दिले. असं म्हणत त्यांनी तक्रार केली.

नेमकं प्रकरण काय?

छावा (Chhaava) या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र गणोजी शिर्के यांचे वंशज संतापल्याचं पाहायला (Chhaava Movie) मिळतंय. त्यांनी छावाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

यासंदर्भात पत्रकार परिषद घेत गणोजी शिर्के यांच्या नातेवाईकांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. छावा चित्रपट प्रदर्शित करताना गणोजी शिर्के यांच्या घराण्याची बदनामी केलीय. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिर्के घराण्याचे मुख्य वंशज, किल्ले धर्मवीरगड बहादुरगड संस्थानिक दीपक राजे शिर्के म्हणाले की, द्वेषापोटी, जाणीवपूर्वक हा षडयंत्र करून इतिहास बदलून मांडण्यात आलाय. असं ते म्हणाले होते.

follow us