Chhota Bheem Teaser Out: ॲनिमेटेड छोटा भीम हे कार्टून आज देखील लहान मुलांमध्ये फेमस आहे. आपल्या बालपणात हे नाटक बघितलं नाही, अशी व्यक्ती मिळणं ही खूप कठीण आहे. छोटा भीम, राजु, जग्गु बंदर, चुटकी. कालिया, ढोलू आणि भोलू हे पात्र कदाचित तुम्हाला आठवत असणार आहेत. या कार्यक्रमातील काही पात्रं आहेत, त्यांची चर्चा नेहमी सोशल मीडियावर बघायला मिळत असते. कार्टून क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा छोटा भीम लवकरच आपल्याला आता रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=CMYyIp_Z5IA
तसेच सिनेमाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजीव चिलाका दिग्दर्शित सिनेमामध्ये चाहत्यांना छोटा भीमचं एक अनोखं रुप बघायला मिळणार आहे. धमाकेदार ॲक्शन आणि जबरदस्त कथा असलेल्या या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे बघायला मिळणार आहेत. ‘छोटा भीम अँड द कर्स ऑफ दम्यान’ हा ॲनिमेटेड सिनेमा गेल्या काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी या सिनेमाच्या लाइव्ह-ॲक्शन आवृत्तीची घोषणा देखील करण्यात आला आहे.
तसेच टीझरची सुरुवातच सर्वांचा आवडता छोटा भीमच्या दमदार ॲक्शनने होत असल्याचे बघायला मिळत आहे. या अॅक्शनपटामध्ये अनुपम खेर गुरु शंभूच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहे. मकरंद देशपांडे स्कंधीच्या भूमिकेत, तर यज्ञ भसीन छोटा भीमच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. टीझरमध्ये छोटा भीमने गुरु शंभूच्या मदतीने त्याच्या सर्व शत्रूंबरोबर दोन हात करत असताना दिसून येत आहे. भीमचे अनेक ॲक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.
Ira Khan Wedding: आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ? लग्नाची तारीख आली समोर
सिनेमातील इतर पात्रांविषयी सांगायचे झालं तर, कालियाचे पात्र कबीर साजिद, राजूचे एडविक जैस्वाल, ढोलू आणि भोलूचे पात्र दिव्यम आणि दैविक, स्वर्ण पांडे इंदुमतीच्या भूमिकेमध्ये तर संजय बिश्नोई राजा इंद्रवर्माच्या भूमिकेत दिसत आहेत. सोबतच आश्रय मिश्रा-चुटकीचे पात्र तर सुरभी तिवारीने टुनटुन मावशीचे पात्र साकारणार आहेत.
राजीव चिल्का यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ॲनिमेटेड सिनेमाचेही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी दिग्दर्शनाबरोबर सिनेमाची कथा देखील लिहिली आहे. राघव सच्चर यांनी सिनेमाला संगीत दिले असून सिनेमाचे व्हिज्युअल इफेक्ट जुनेद उल्लाह यांनी तयार केले आहेत. ग्रीन गोल्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी मे २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.