कोकणाची सिनेमॅटिक जादू ‘कैरी’ चित्रपटात कैद; संस्कृती, भाषेचंही हुबेहूब दर्शन प्रेक्षकांसमोर

Kairi या मराठी सिनेमातून कोकणचे सौंदर्य सिनेमॅटिक, मोहक आणि आत्म्याला स्पर्श करणारी जादू प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Kairi

Kairi

Cinematic magic of Konkan is captured in the film ‘Kairi’ : कोकणचे सौंदर्य म्हणजे केवळ रंग, सुगंध दृश्य किंवा निसर्ग नाही तर त्या म्हणजे भावना आहेत. त्या भावनांमध्ये दडलेली प्रत्येक जादू ही सिनेमॅटिक, मोहक आणि आत्म्याला स्पर्श करणारी आह. अशा सुंदर सिनेमॅटिक शॉट्सचं एक परिपूर्ण असं मिश्रण आगामी ‘कैरी’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोकण ही एक जिवंत कथा आहे आणि तिच्यात सामावलेली एक अशी जादू जी पाहणाऱ्याच्या मनात नेहमीच घर करून राहते याचं सुंदर असं वर्णन ‘कैरी’ या सिनेमात करण्यात आलं आहे.

पुण्यातील औंध स्टेशन येथे पार पडले सिव्हिल आणि मिलिटरी फ्युजनसाठीचं प्रशिक्षण

कोकण म्हटलं की, हिरव्यागार पर्वतरांगा, चकाकणारा समुद्र, नारळाच्या गर्द सावल्या, मातीचा मंद ओलसर सुगंध डोळ्यासमोर येतो आणि आणि याचं हुबेहूब दर्शन ‘कैरी’ या चित्रपटात अत्यंत सिनेमॅटिक पद्धतीने कॅमेराच्या लेन्स मधून टिपले गेले आहे. कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणासह कोकणाची संस्कृती ही टिपण्यात ‘कैरी’ सिनेमाची टीम कुठेही मागे राहिलेली नाही.

मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर

कोकणात पार पडणारा शिमगा असुदे वा देव-देवतांच्या निघणाऱ्या पालख्या असुदे आणि इतकंच नाहीतर अत्यंत पारंपरिक पद्धतीने थाटामाटात होणारं कोकणातील लग्न असुदे हे सगळं काही सुंदररित्या ‘कैरी’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version