Download App

VIDEO : कंगनाच्या ‘इमर्जेन्सी’चं फडणवीसांकडून कौतुक पण, म्हणाले इंदिरा गांधी त्या काळातील व्हिलन

CM Devendra Fadnavis At special screening of Emergency : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘इमर्जेन्सी’ या चित्रपटाबद्दल (Emergency Film) अभिनेत्री कंगना रनौतचं अभिनंदन केलंय. एका अत्यंत महत्वाच्या विषयावर त्यांनी चित्रपट निर्माण केलाय. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. कंगणासह (Kangana Ranaut) इमर्जेन्सीच्या संपूर्ण टीमलाच देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इमर्जेन्सी हा आपल्या सगळ्यांसाठीच असा काळ होता, जेव्हा सगळ्यांचे मानवाधिकार संपवले गेले होते. मुंबईतील बीकेसीमध्ये ‘इमर्जेन्सी’ फिल्मचं स्पेशल स्क्रिनींग पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Video : … आता मात्र भीती वाटायला लागलीये; सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेचं विधान चर्चेत

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासाठी त्या आठवणी खूपच संस्मरणीय आहेत. कारण त्यावेळी आणीबाणी असताना माझे वडिल तुरूंगात होते. त्यावेळी मी केवळ पाच वर्षांचा (Bollywood News) होतो. तेव्हा वडिलांना भेटण्यासाठी न्यायालयात किंवा तुरूंगात जावं लागत होतं. त्यामुळं त्या घटना आजही ताज्या वाटतात, असं फडणवीस म्हणतात. तोच काळ कंगनाजींनी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणलाय, असं देखील फडणवीस म्हणालेत.

या चित्रपटात कंगनाजी जी भूमिका करत आहे, तसं त्या प्रत्येक भूमिकेला न्याय देतात. त्या एक बहुआयामी अभिनेत्री आहेत. आमच्यासाठी इंदिराजी खूप मोठ्या आहेत. त्या देशाच्या नेत्या होत्या. परंतु त्या काळात इंदिराजी आमच्यासाठी व्हिलन होत्या, असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. परंतु ठीक आहे. प्रत्येक काळाची एक गोष्ट असते. इंदिराजींनी देखील देशासाठी चांगलं काम केलंय. मला वाटतंय की, ‘इमर्जेन्सी’ ही देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र आहे. तिला देशवासियांपर्यंत पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Video : मुंबई असुरक्षित म्हणणे चुकीचे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

जर आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर आपल्या गणतंत्रावर आलेल्या संकटांची माहिती आपण जर येणाऱ्या पिढीला दिली नाही. तर तोपर्यंत या लोकशाहीची किंमत काय आहे, हे येणाऱ्या पिढीला कळणार नाही. हा ‘इमर्जेन्सी’ चित्रपट अशाच प्रयत्नांचा एक भाग आहे, असं मी मानतो. या चित्रपटाच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगच्या वेळी म्हणाले आहेत. तसंच पुन्हा एकदा फडणवीसांनी कंगणाचं अभिनंदन केलंय.

follow us