Sonam Kapoor : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ (Come Fall in Love – The DDLJ Musical) च्या कास्टची घोषणा केली असून, बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) याबाबत खूप उत्सुक आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या ‘ईस्ट मीट्स वेस्ट’ स्टाईल म्युझिकल कॉमेडीमध्ये जेना पंड्या आणि ऍशली डे हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हे नाटक भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) वर आधारित आहे.
सोमवारी, सोनमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या म्युझिकलबाबत पोस्ट शेअर करत आदित्य चोप्रा आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टर शेअर करत लिहिले, “DDLJ, पण आता म्युझिकलच्या रूपात! या टाईमलेस क्लासिकच्या या नव्या रुपांतराची मला वाट बघवत नाही.
संपूर्ण टीमला अभिनंदन! #TheDDLJMusical.” सोनमसाठी हा एक संगीतमय उन्हाळा असणार आहे! ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ युकेमधील मॅंचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये 29 मे ते 21 जून 2025 दरम्यान सादर होणार आहे.
‘जादू तेरी नजर…डायन का मौसम’ उद्या प्रेक्षकांच्या भेटीला; थरारक दृश्यांचा अनुभव