सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; कॉमेडियन समय रैना पुरता गोत्यात; इतक्या रुपयांचा ठोठावला दंड

आदेशाचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वाढू शकते, असेही न्यायालयाने समय रैना तसेच इतर चौघांना बजावले आहे.

News Photo   2026 07 14T212729.278

सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; कॉमेडियन समय रैना पुरता गोत्यात; इतक्या रुपयांचा ठोठावला दंड

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉमेडियन (Entertainment) समय रैना तसेच इतर चार विनोदवीरांना चांगलाच दणका दिला आहे. या सर्वांना 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. समय रैनासह यात विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. या सर्वांनीच दोन आठवड्याच्या आत आपला दंड कोर्टात जमा करावा, असा आदेश न्यायालयाने केला आहे.

आदेशाचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वाढू शकते, असेही न्यायालयाने समय रैना तसेच इतर चौघांना बजावले आहे. समय रैना तसेच इतरांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस व्ही मोहन यांनी हा आदेश दिला आहे. एसएमए इंडिया फाऊंडेशनद्वारे एक याचिका दाखल करण्यात आली होती.

मोठी बातमी! रणवीर अल्लाहबादिया-समय रैनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या याचिकेत समय रैना तसेच इतर कॉमेडियन्सने मणक्याच्या एका गंभीर आजाराची खिल्ली उडवली. तसेच या आजाराशी पीडित असलेल्या एका व्यक्तीचीही त्यांनी खिल्ली उडवली. इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात समय रैना तसेच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विपुल गोयल, बलराज परमजित सिंह घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तन्वर यांनी आक्षेपार्ह विनोद केले, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेची दखल घेत नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायालयाने समय रैना तसेच इतर विनोदवीरांना एक आदेश दिला होता. त्यांनी प्रत्येक महिन्याला दोन शो करावेत.

या शोच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उपचारासाठी आर्थिक महदत व्हायला हवी. या सर्वांनीच दिव्यांगांनाही आपल्या शोमध्ये सहभागी करून घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. याच आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने समय रैना तसेच इतरांना दंड ठोठावला आहे. दरम्यान, आता समय रैनाला तसेच इतर विनोदवीरांना दंड भरावा लागणार आहे.

Exit mobile version