Crossover Queen Sai Tamhankar! : हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर ! कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून तिने आज दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ओटीटी, चित्रपट अश्या विश्वात कायम तिच्या अभिनयाच्या चर्चा बघायला मिळतात.
“मटका किंग” जगभरात ट्रेंड झाल्यावर आता सई पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि तितक्याच दर्जेदार मराठी चित्रटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. ” तुंबाडची मंजुळा” या चित्रपटात सई एका लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सईची भूमिका ही तितकीच वेगळी आणि लक्षवेधी ठरणार यात शंका नाही. ती या चित्रपटात काय भूमिका साकारणार ? चित्रपटातील मंजुळा सई असणार का ? अश्या अनेक चर्चांना सध्या उधाण आल्याचं दिसतंय.
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित, मिळणार विधानपरिषदेची उमेदवारी; ‘या’ दिवशी करणार पक्ष प्रवेश
2025 मध्ये सई ने गुलकंद चित्रपटात एक सुंदर भूमिका साकारली आणि अता 2026 मध्ये “तुंबाडची मंजुळा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. कधी ही न थांबणारी सतत वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारी सई ही नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच मन जिंकून घेताना दिसते.
सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ते तिने आजवर केलेल्या भूमिका या कायम कौतुकास्पद राहिल्या आहेत. गुलकंद, पाँडिचेरी, दुनियादारी, मिडियम स्पायसी, कुलकर्णी चौकातला देशपांडे, वजनदार, याबरोबरच मानवत मर्डर्स, बेरोजगार, डब्बा कार्टेल , अग्नी, ग्राउंड झिरो, मिमी, मटका किंग अशा मराठी-हिंदी चित्रपट वेब सीरिज मधल्या तिच्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत.
येणाऱ्या काळात देखील सई हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत अजून दर्जेदार कथा आणि वेगवेगळ्या भूमिकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.
