Rani Mukharji : सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभं राहण्याचा संकल्प करण्याचा निर्धार अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukharji ) सायबर जनजागृती कार्यक्रमात केलायं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत सायबर जनजागृती 2025 चे उद्घाटन पार पडलं. यावेळी राणी मुखर्जीने संबोधित केलं.
पुढे बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, सायबर अवेअरनेस मंथच्या उद्घाटनाचा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे, माझ्या चित्रपटांमधून मला अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि दुर्बलांचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया साकारण्याचे भाग्य लाभले आहे. खरं तर, आज मी थेट मर्दानी 3 च्या शूटिंगवरून येथे आले आहे, त्यामुळे हा क्षण अतिशय विलक्षण वाटतो. महाराष्ट्र पोलिसांनी घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय असल्याचं मुखर्जी म्हणालीयं.
‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित; ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
तसेच आज सायबर गुन्हे विशेषत: महिलांवर आणि मुलांवर होणारे शांतपणे आपल्या घराघरात शिरत आहेत. एक स्त्री आणि आई म्हणून मला ठाऊक आहे की जागरूकता किती महत्त्वाची आहे. जेव्हा कुटुंबांना कसे सुरक्षित राहायचे आणि मदत कुठे मिळेल हे माहित असते, तेव्हाच खरी सुरक्षा सुरू होते. या महत्त्वाच्या मोहिमेला प्राधान्य दिल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री, माननीय ACS साहेब आणि आदरणीय DGP मॅडम यांचे आभार मानत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
राणी मुखर्जी यांनी महिलांवर आणि मुलांवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्याविषयी जागरूकता वाढवली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचे कौतुक केले. हे ते अनोळखी नायक आहेत जे रात्रंदिवस एक सुरक्षित डिजिटल जग निर्माण करण्यासाठी काम करत असतात.
अखेर दसरा मेळाव्यात उत्तर मिळालं! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार, ‘त्याच दिवशी…’
दरम्यान, डायल 1930 आणि डायल 1945 या हेल्पलाइन सर्व नागरिकांसाठी वरदान आहेत. एक कलाकार म्हणून मी पडद्यावर कथा जिवंत करते, पण एक स्त्री, एक आई आणि एक नागरिक म्हणून मला वाटते की हे आपले सामूहिक कर्तव्य आहे की कोणतेही मूल शांतपणे रडू नये, कोणतीही स्त्री असुरक्षित वाटू नये आणि कोणतेही कुटुंब सायबर गुन्ह्यामुळे आपली शांतता गमावू नये, असंही त्या म्हणाल्या आहेत.
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्या म्हणाल्या “चला आज आपण सगळे मिळून सतर्क राहण्याचा, आवाज उठवण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभे राहण्याचा संकल्प करूया. राणी मुखर्जी यांचा पुढील चित्रपट मर्दानी 3 २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे आणि दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे.