हैद्राबाद : जेष्ठ तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हमजेच के. विश्वनाथ यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गुरूवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. वयोमानामुळे ते विविध गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हैद्राबादमधील रूग्णालायात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांच निधन झालं.
2017 मध्ये त्यांना ‘बाळासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. 1992 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्याच बरोबर तब्बल 20 वेळा त्यांना आंध्र प्रदेश सरकारचा नांदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर
त्यांनी तेलगू दिग्दर्शक असताना हिंदीमध्ये देखील आपला वेगळा ठसा उमटवत मोठी भूमिका पार पाडली. पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.