Download App

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

Devendra Fadanvis on Adipurush : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. ( DCM Devendra Fadanvis gives wishes to Adipurush Movie )

Shinde VS Fadanvis : जाहिरातवादानंतर शिंदे- फडणवीस आज एकाच मंचावर; नाराज फडणवीस काय बोलणार?

या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आदिपुरूष चित्रपटाचं पोस्टर कम्प्युटर स्क्रिनवर पाहतानाचे आपले फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्याफोटोंसह त्यांनी चित्रपटाला आदिपुरूष प्रभु श्रीरामांचे आशीर्वाद आहेत असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि टीमला देखील त्यांनी या ट्विटमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

Ravikant Tupkar : आठ दिवसांत मागण्या मान्य करा अन्यथा… आंदोलन मागे घेत तुपकरांनी दिला इशारा

काय आहे फडणवीसांचं ट्विट?

या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आदिपुरूष या चित्रपटाला आदिपुरूष प्रभु श्रीरामांचे आशीर्वाद आहेत. तर बहुप्रतिक्षित आदिपुरूष चित्रपट हा मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीरामांच्या जीवनावर आधारित आहे. दिग्दर्शकांना, निर्मात्यांना आणि टीमला शुभेच्छा! आदिपुरूष चार्टबस्टर सक्सेस.’ असं कॅप्शन देत फडणवीसांनी या ट्विटमध्ये चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी देखील टॅग केले आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमामध्ये प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘रामायणा’वर आधारित असलेला हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं यू सर्टिफिकेट मिळाले आहे.‘आदिपुरुष’चं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पसंतीस उतरल्याने चाहते आता सिनेमाची प्रतिक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us