Download App

Sushant Singh Rajput death: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले…

Sushant Singh Rajput death: जून २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput death) अचानक निधनाने देशालातील मनोरंजनसृष्टीला (Entertainment) मोठा धक्का बसला होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. तो त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याबद्दल सतत चर्चा होत होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.


परंतु गेले ३ वर्षे उलटून देखील तपासामध्ये काहीही धागेदोरे सापडले नाहीत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी आता नवा खुलासा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, “सुरुवातीला या प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. मिळालेल्या माहितीवर आधारित होती, परंतु नंतर काही लोकांनी ठामपणे सांगितले आहे की, त्यांच्याकडे या खटल्याच्याविषयी ठोस पुरावे मिळाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Sr_yMqaS6-c

त्यानंतर त्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, “सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता अधिकारी तपास करत आहेत. ते पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याच्या आधारावर आम्ही नक्कीच कारवाई करणार आहोत. परंतु सध्या मी या प्रकरणावर कोणतंही भाष्य करणं चुकीचे ठरणार आहे. योग्य वेळ आल्यावर मी त्यासंदर्भामध्ये नक्की बोलेन, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० मध्ये वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नवीन अपडेट दिली आहे. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूप्रकरणात आणखी काय नवीन खुलासे होणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us