Download App

Dharmendra यांची प्रकृती खालावली; सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना

Dharmendra Health: बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलने (Summy Deol) कामातून ब्रेक घेतला आहे, आणि तो देखील अमेरिकेला गेल्याची माहिती मिळाली आहे.

https://x.com/Bollyhungama/status/1701453074018296142?s=20

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची (Dharmendra Health) माहिती कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहे. तसेच सनी देओलच्या टीमशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताची माहिती दिल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सनी देओलच्या टीमने सांगितले आहे की, ‘सनी देओल त्याचे वडील धर्मेंद्र यांना कोणत्याही उपचारासाठी नाही, तर सुट्टीसाठी अमेरिकेला घेऊन गेले आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत सनी देओल आणि धर्मेंद्र मुंबईला परत येणार आहेत.’ धर्मेंद्र यांना यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या तब्येतीची माहिती देण्यात आली.

Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”

धर्मेंद्र यांनी त्यावेळी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होत की, ‘मित्रांनो मी धडा शिकलो’ असे कॅप्शन दिल्याचे बघायला मिळाले होते. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले होते की, माझ्या पाठीमध्ये दुखत असल्यामुळे उपचारासाठी मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले होते. हॉस्पिटलमधील दोन ते चार दिवस खूपच अवघड होते.’ धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावे, याकरिता प्रार्थना केल्याचे सांगण्यात आले होते.

Tags

follow us