यापुढे मराठी मार खाणार नाही! उत्तर चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांची प्रतिक्रिया

उत्तर सिनेमाच्या उत्तुंग यशानंतर सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांची प्रतिक्रिया समोर.

Untitled Design   2025 12 20T152318.815

Untitled Design 2025 12 20T152318.815

Director Kshitij Patwardhan’s reaction after the huge success of the film Uttar : उत्तर सिनेमाच्या उत्तुंग यशानंतर सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर ‘धुरंधर’ आणि चार पाच वर्षातून एकदा येणारा ग्लोबल फेनॉमेना ‘अवतार’ यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा ‘उत्तर’ प्रदर्शित झाला. ‘धुरंधर’ ने रणवीरच्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं कि व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही.

पुण्यात ऑपरेशन ‘लोटस’, आमदार पुत्र सुरेंद्र पठारे भाजपवासी, पण का? समजून घ्या राजकारण

उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं. 12 ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की सिनेमा 19 ला रिलीज होतोय असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेजला सुद्धा शहरी सेंटर्स मध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हलला सिलेक्शन झालं. बुक माय शो वर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्या कल्पनांची दखल घेतायत.

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; गिल आऊट, कुणाला मिळाली संधी?

आज दुसरा विकेंड आहे आणि 6 ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतारचे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी ‘मराठी फॅमिली फिल्म’ म्हणून ‘उत्तर’ चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं की, या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं की कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!

Exit mobile version