लेखक, दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूड फिल्ममेकर हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाचं माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान मोठा दिग्दर्शक हरपला आहे. प्रदीप सरकार […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (90)

Pradeep Sarkar

मुंबई : सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूड फिल्ममेकर हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाचं माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान मोठा दिग्दर्शक हरपला आहे.

प्रदीप सरकार डायलिसिसवर होते. त्यांच्या शरिरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फिल्ममेकर आणि त्यांचे जवळचे मित्र हंसल मेहता यांनी प्रदीप सरकार यांचा फोटो पोस्ट केला आहे. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी लिहिले, ‘प्रदीप सरकार. दादा. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.’

नागराजचा Ghar Banduk Biryani सिनेमा ‘या’ तारखेला होतोय रिलीज

प्रदीप सरकार यांचे चित्रपट

2006 मध्ये रिलीज झालेल्या ‘परिणीता’ या चित्रपटामधून प्रदीप सरकार यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त आणि सैफ अली खान याच्याबरोबर त्यांनी काम केलं. हेलीकॉप्टर ईला,लफंगे परिंदे, मर्दानी यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी कोल्ड लस्सी और चिकन मसाला (२०१९), अरेंज्ड मॅरेज अँड फॉरबिडन लव्ह आणि दुरंगा यासारख्या अनेक वेब सीरिजमध्ये देखील दिग्दर्शन म्हणून काम पहिले आहे.

आज संध्याकाळी ४ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version