Download App

शाहरुखच्या पठाणबद्दल दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाले…

मुंबई : किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एका व्हिडीओमधून पठाण चित्रपटाची आणि कलाकारांची खासियत सांगितली आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाले की, ‘शाहरुख खानला दिग्दर्शित करणे मोठी जबाबदारी आहे. तर त्याच्या 4 वर्षांनंतरच्या पुनरागमणामुळे चाहत्यांना मोठ्या आपेक्षा आहेत. आम्ही आता हा चित्रपट रिलीज करत आहोत.’

पुढे सिद्धार्थ आनंद म्हणाले की, ‘शाहरुख आणि दिपिकाने एकत्र अनेक चित्रपट केले पण यामध्ये त्यांनी काही तरी वेगळे दिसणं वाटनं हे मोठं चॅलेंज होत. तर शाहरुख आणि दिपिका यामध्ये त्यांच्या ओम शांति ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यु इअर चित्रपटांपेक्षा वेगळे दिसले त्यामुळे ते फ्रेश वाटत आहेत.’

10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.

‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जेमतेम काही दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मद्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

Tags

follow us