Download App

रोमान्स अन् कॉमेडीने भरपूर Do Aur Do Pyar चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Do Aur Do Pyar Trailer Release : दो और दो प्यार ( Do Aur Do Pyar ) या बहुप्रतिक्षित रॉम-कॉम चित्रपटाच्या टीझरनंतर ट्रेलर देखील अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विद्या बालनने ( Vidya Balan ) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे. जी विद्या बालन आणि अभिनेता प्रतिक गांधी या विवाहित दाम्पत्याच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे.

सुनेत्रा पवार अन् धंगेकरांची अचानक भेट; सुसंस्कृत राजकारणाच्या पुणे पॅटर्नचा आला प्रत्यय

मात्र विद्या आणि प्रतिक हे आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी नाहीत. त्यातून जन्माला येणारे त्यांचे विवाहबाह्य संबंध हे या चित्रपटात दाखवले आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक प्रेम कहानी असल्याचे झलक पाहायला मिळत आहे. एक आश्चर्यकारक प्रेम कहानी तितकीच मनोरंजक देखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवॉर्ड विनिंग अँड फिल्म मेकर शर्षा गुहा ठाकुरता यांनी केलं असून चित्रपटामध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी इलियाना डीक्रूज आणि राममूर्ती यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटातील अगदी पहिल्यांदाच एकत्र येणारे आणि नवख्या जोड्यांमुळे चित्रपटामध्ये एक वेगळी एनर्जी पाहायला मिळते. ज्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड मनोरंजन अनुभवता येणार आहे. यामध्ये प्रेम, विनोद तसेच मॉडर्न रिलेशनशिप आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंत या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तर विद्या बालन गेल्या कित्येक दिवसानंतर कमबॅक करत असून ती एका रॉम कॉममध्ये देखील बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करणारी आहे.

फडणवीसांनी चहापानावरच साधला डाव; सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुख माने अजितदादांच्या गोटात

मनोरंजक संवाद नाते भावना या सर्वांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. शीर्षा गुहा ठाकूरता यांनी या चित्रपटातून आपल्या फीचर फिल्म डिरेक्शनला सुरुवात केली आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 ला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज