मुंबई : ‘पठाण’ हा हिंदी चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाला आमचा विरोध नाही पण पठाण हा शाहरूख खानचा कमबॅक आहे. तो ही चित्रपट चालावा. प्रक्षकांनी हा चित्रपट बघावा. मात्र या मराठी चित्रपटांना कोणत्याही मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन थिएटरने या चित्रपटांचे शो लावले नाहीत. मी याचा निषेध करतो. जर मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी चित्रपटांचे शो लावले नाहीत तर मी त्यांना इशारा देतोय की, महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि आम्ही बघून घेऊ कसे मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत.’ मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे.
‘पण अनेक दिवसांपासून वेड हा मराठी चित्रपट संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होऊन चांगलं कलेक्शन, चांगला बिझीनेस करत आहे. त्यानंतर वाळवी आला त्याने देखील दोन आठवडे चांगलं कलेक्शन केलं. तर आज बांबू, पिकोलो आणि व्हिक्टोरिया हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहे. असे अनेक मराठी चित्रपट आहेत.’ असंही अमेय खोपकर म्हणाले.
आज अखेर ‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत.
जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला होता.
अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत होता. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.
2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मध्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.