Download App

Don 3 First Look: ‘डॉन 3’ ची घोषणा करत व्हिडिओ रिलीज; रणवीर सिंगने घेतली …

Don 3 First Look: डॉन या सिनेमाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी आणि किंग खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर आतापर्यंत डॉनची भूमिका साकारली होती. परंतु आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असल्याचे पाहायला मिळत आहे.


डॉन आणि ‘डॉन 2’ चे दिग्दर्शन करणाऱ्या फरहान अख्तरने ‘डॉन 3’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये रणवीर हा हटक्या लूकमध्ये पाहायला मिळालं आहे. फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांनी ‘डॉन 3’ सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला त्यांनी कॅप्शन देखील देण्यात आले आहे, ‘A New Era Begins’ “हो जानते,जो मेरा नाम है.

११ मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन? मैं हूं डॉन.” हा रणवीर सिंहचा डायलॉग टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे. ‘डॉन-3’ सिनेमाच्या टीझरमधील रणवीरचा स्वॅग आणि स्टाईलने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बीं यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या सिनेमात डॉनची भूमिका साकारली होती. या सिनेमात बिग बी यांच्या अभिनयला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली होती.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डॉन’ सिनेमात किंग खानने डॉनची मुख्य भूमिका साकारली होती. तसेच २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन २’ सिनेमामध्ये देखील किंग खानने डॉनची भूमिका साकारली. परंतु आता डॉन-३ सिनेमामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार आहे, तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन म्हणून ओळखला जाणार आहे.

Tags

follow us