Dream Girl 2 चित्रपटाची दमदार कमाई, सहाव्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Box Office Colletion: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) सिनेमाचा सिनेमागृहांमध्ये सध्या जोरदार जलवा बघायला मिळत आहे. (Ayushmann Khurrana) ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ अशा तगडी स्टारकास्ट आणि बजेट असलेल्या सिनेमामध्ये ड्रीम गर्ल टिकेल की नाही, अशी शंका होती. परंतु या सिनेमाला चाहते देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. सिनेमाने सहाव्या दिवशी देखील […]

Dream Girl 2

Dream Girl 2

Box Office Colletion: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) सिनेमाचा सिनेमागृहांमध्ये सध्या जोरदार जलवा बघायला मिळत आहे. (Ayushmann Khurrana) ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ अशा तगडी स्टारकास्ट आणि बजेट असलेल्या सिनेमामध्ये ड्रीम गर्ल टिकेल की नाही, अशी शंका होती. परंतु या सिनेमाला चाहते देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. सिनेमाने सहाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. त्याची एकूण आकडेवारी देखील समोर आली आहे.


सनी पाजीच्या ‘गदर २’ आणि खिलाडीच्या ‘ओएमजी २’ या सिनेमांशी स्पर्धा असून देखील आयुष्मान खुरानाच्या सिनेमाला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तगडी कमाई केली आहे. सोमवार आणि मंगळवारी सिनेमाची कमाई स्थिर राहिली त्याने अनुक्रमे ५.४२ कोटी आणि ५.८७ कोटी रुपये कमावले आहेत. आता सिनेमाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाईचे प्रारंभिक आकडे देखील समोर आले आहेत. त्यानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ड्रीम गर्ल २’ ने प्रदर्शितच्या सहाव्या दिवशी ७.७५ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच या सिनेमाची ६ दिवसांत एकूण कमाई आता ५९.७५ कोटी रुपये झाली आहे.ड्रीम गर्ल २ ची सहा दिवसांची कमाई, पहिला दिवस- १०.६९ कोटी रुपये, दुसरा दिवस- १४.२ कोटी रुपये, तिसरा दिवस- १६ कोटी रुपये, चौथा दिवस- ५.४२ कोटी रुपये, पाचवा दिवस- ५.८७ कोटी रुपये, सहावा दिवस- ७.७५ कोटी रुपये, तसेच एकूण कलेक्शन- ५९.७५ कोटी रुपये.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

हा संपूर्ण आठवडा सिनेमाने जोरदार कमाई केली आहे. यामुळे दुसऱ्या वीकेंडला याच्या कमाईमध्ये आणखी वाढ बघायला मिळणार आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या ‘ड्रीम गर्ल’ सिनेमाचा सिक्वेल आहे.

Exit mobile version