‘Drishyam The Conclusion’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या 4 दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा पार!

Drishyam The Conclusion ने जगभरात तब्बल 270.22 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर पहिल्या सोमवारची कमाईही जबरदस्त केली.

Drishyam The Conclusion

Drishyam The Conclusion

Drishyam The Conclusion’ takes the box office by storm crosses Three Hundred crore mark worldwide in just 4 days : दमदार ओपनिंग वीकेंडमध्ये जगभरात तब्बल 270.22 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘Drishyam The Conclusion’ ने पहिल्या सोमवारची कमाईही जबरदस्त केली आहे. पहिल्या सोमवारी चित्रपटाने आणखी 34.16 कोटी रुपयांची कमाई केली असून, अवघ्या चार दिवसांत चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 304.38 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

शिवसेना चिन्हाच्या वादात सुप्रीम कोर्टाचे शिंदे गटाला थेट सवाल; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नांनी सुनावणीला वेगळं वळण

पहिल्या सोमवारची दमदार कमाई ‘Drishyam The Conclusion’च्या शानदार बॉक्स ऑफिस रनवर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे परदेशातील बाजारपेठांमध्येही या चित्रपटाने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘दृश्यम’ फ्रँचायझीची प्रचंड लोकप्रियता आणि चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता याचा चित्रपटाला मोठा फायदा होत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कायम असून, बॉक्स ऑफिसवर तो नवनवे विक्रम रचत आहे.

फ्रान्सिस हाल्झेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल; न्यूट्रिनोच्या शोधासाठी मिळाला मानाचा सन्मान

अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘Drishyam The Conclusion’मध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या दमदार कलाकारांच्या एकत्रित अभिनयातून लोकप्रिय ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा अंतिम अध्याय प्रेक्षकांसमोर साकारण्यात आला आहे. ‘Drishyam The Conclusion’ सध्या तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version