Download App

Dunki: किंग खानची मोठी घोषणा; या दिवशी प्रदर्शित होणार ‘डंकी’

Dunki: किंग खानने त्याला बॉलिवूडचा बादशाह का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. किंग खानच्या नुकत्याच आलेल्या जवान या सिनेमाने देशभरात सुमारे ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाण (Pathaan Movie) आणि जवान (Jawan Movie) च्या यशानंतर चाहते किंग खान (Shah Rukh Khan)च्या डंकी (Dunki Movie) या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीन वाढली असल्याचे बघायला मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात आला आहे की, सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, किंग खानने यावर मौन सोडले आहे. जवान सिनेमाच्या सक्सेस निमित्ताने नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी किंग खानने अनेक गोष्टींचा खुलासा केल्याचे सांगितले जात आहे. “मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. पठाणला एवढं मोठं यश मिळालं यावर देवाची कृपा आहे. देव जवानच्या बाबतीत आणखी दयाळू राहिला असेल की, आणखी लोकांनी त्याच्यावर प्रेम केल्याचे दिसत आहे.

डंकी सिनेमा ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. किंग खान म्हणाला आहे की, ‘आम्ही २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला सुरूवात केली. हा एक चांगला, शुभ दिवस ठरणार आहे. यानंतर भगवान कृष्णाच्या जन्मदिवस जन्माष्टमीला आम्ही हा सिनेमा प्रदर्शित केला आहे, आणि आता ख्रिसमसला आम्ही डंकी हा सिनेमा आपल्या भेटीला आणणार आहोत. तसेच माझा राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास असल्याचे देखील यावेळी त्याने सांगितले आहे.

‘जवान’मधील अभिनयाबद्दल शाहरुख खानने केले स्वतःचे कौतुक; म्हणाला, ‘मेरा तो जवाब ही नहीं’

तो पुढे सांगितलं आहे की, असो, माझा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होतो, तेव्हा ती ईद असते. तुम्हाला सांगतो की, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर किंग खानचा ‘डंकी’ हा सिनेमा आहे. यामध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशल या दोघांच्या मुख्य भूमिका आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. २००४ नंतर किंग खानचे एका वर्षामध्ये ३ सिनेमा प्रदर्शित होण्याची ही पहिली वेळ आहे.

अॅटली दिग्दर्शित जवान या सिनेमाविषयी सांगायचं झालं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. अॅक्शन थ्रिलरने देशभरात सुमारे ७०० कोटी रुपये आणि एकट्या भारतात ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.  यामुळे तो ‘पठाण’ आणि गदर २ नंतरचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज