Download App

Ek Don Teen Char : सम्या-सायलीच्या क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ; ‘एक दोन तीन चार’चा टीझर रिलीज

Ek Dok Tin Char Teaser Release: अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच "एक दोन तीन चार" या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Ek Dok Tin Char Teaser Release: अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! (Marathi Movie) होय कारण नुकताच “एक दोन तीन चार” (Ek Dok Tin Char Movie) या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Ek Dok Tin Char Teaser)त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे, ह्याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून पाहायला मिळत आहे.

आता हा हॅपिनेस’चा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे, हे आपल्याला येत्या 19 जुलै दिवशी समजणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा दिसणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांच्या साहाय्याने “एक दोन तीन चार” हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा 19 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट

आजच्या तरुण वर्गाच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने ‘एक दोन तीन चार’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या तरुण वर्गाबरोबरच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट असणार आहे.

‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर ‘एक दोन तीन चार’ नवा सिनेमा 19 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

निपुण धर्माधिकारीने ‘एक दोन तीन चार’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “होती खरं लव स्टोरी..पण गडबड झाली थोडी…एक दोन तीन चार’ 5 जानेवारीपासून फक्त सिनेमागृहात…भेटूया नववर्षात”. निपुणने शेअर केलेल्या धमाकेदार टीझरवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं असल्याचे पाहायला मिळत आहे.

follow us

वेब स्टोरीज