Ek Khidki Pranali 2.0 : दादासाहेब फाळके चित्रनगरी तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक खिडकी प्रणाली २.०’ या अभिनव उपक्रमाला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच गोल्ड पुरस्कार’ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
नामदेव जाधव यांना खुश करण्यासाठी महापालिकेची स्मार्ट खेळी; दहा लाखांची पुस्तक खरेदी करणार
चित्रपट, मालिका, जाहिराती आणि इतर ऑडिओ-व्हिज्युअल प्रकल्पांच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच ठिकाणी आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी २०१८ मध्ये महामंडळाच्या कलागरे विभागामार्फत ‘एक खिडकी प्रणाली’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रणालीचे अद्ययावत रूप ‘एक खिडकी प्रणाली २.०’ विकसित करण्यात आले.
या नव्या प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरली असून ती आता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात चित्रीकरण सुलभ झाले असून महाराष्ट्राला चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी अधिक आकर्षक ठिकाण बनवणे, गुंतवणूक वाढवणे आणि ‘Ease of Doing Business’ला चालना देणे हे या प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रणालीमुळे निर्मात्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होऊन राज्यातील फिल्म इंडस्ट्रीला मोठा फायदा होत आहे.
अधिकृत पत्र विरुद्ध व्हायरल पत्र; अक्षय कर्डिले यांना तिकीट, पण सुजय विखेंच्या नावाने पसरली अफवा
दि. २८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुचित्रा देशपांडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
